पारोळा तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या :

पारोळा –
पारोळा – तालुक्यातील वाघरे येथे एका बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली

याबाबत अधिक माहिती अशी की नितिन आधार पाटील २२ या तरूणाने त्याच्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२३ रोजी घडली. तो पारोळा येथील एका खासगी रुग्णालयात रक्त लघवी तपासण्याचे काम करीत होता. याबाबत यशवंत बुधा पाटील वाघरे यांनी पारोळा पोलिसात खबर दिली की, दि. २३ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास
माझी बहीण बंदनाबाई आधार पाटील ह्या आरडाओरडा करत घरी धावत आल्या व त्यांनी कळविले की माझा भाचा नितील आधार पाटील वय २२ हा यांने राहत्या घरात दोरीस गळफास घेतलेला आहे असे सांगितले माझा मुलगा प्रविण यशंवत पाटील, ब्रीजलाल पाटील, रोहीत भागवत पाटील, बबलु चंदनराव पाटील, योगराज दगा पाटील असे आम्ही सर्वजण धावत गेलो व नितीन यास त्याने घेतलेल्या गळफासची दोरी काढून त्यास उपचारासाठी खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता त्यास तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मयत झाल्याचे सांगितले .
याबाबत दि. २३ रोजी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.