शिदाड ता पाचोरा
आज दि 24/03/2024 रोजी पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदाड ते निमखेडी रस्त्याच्या नाल्यालगत तसेच प्रिपी धरणाच्या झाडाझुडपात असलेल्या हमीद लतिफ तडवी,दगडू बाबुलाल तडवी, सुपडू सिकंदर तडवी,पिरखा बाबुलाल तडवी सर्व राह. शिंदाड ता.पाचोरा अशांचे एकूण 95000रुपये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे 1900 लिटरचे कच्चे पक्के रसायन इत्यादी मुद्देमाल पिंपळगाव हरे पोलीस सपोनि प्रकाश काळे यांचे मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमोल पवार, पोहेका रणजित पाटील,पोका अभिजित निकम, पोका संदीप राजपूत,पोका प्रशांत पाटील, पोका अमोल पाटील, पोका योगेश भिलखेडे अशांच्या पथकाने चार ठिकाणी धडक कारवाया करून नष्ट केला. आरोपितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत. यापुढे ही पिंपळगांव हरेश्वर पो स्टे हद्दीत कारवाई सुरु राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले .




