भुसावळ (प्रतिनिधी )-
डॉ.आंबेडकर जयंतीची वर्गणी मागितली असता देण्यास नकार दिल्याने एकास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना येथे अशोक नगर भागात घडली . या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुभाष ऊर्फ विठ्ठल श्रीराम मोरे रा.अशोक नगर यांनी तक्रार दिली की, नॅशनल हायवे क्रमांक सहा वरील सोना एजन्सी जवळ (छोटा हाती) गाडी रोडवर उभी करून घरी जात असतांना बौद्ध विहाराजवळ आरोपी दिपक अशोक आराख,राहुल अशोक आराख,किरण अशोक आराख, वंदनाबाई अशोक आराख सर्व राहणार अशोक नगर यांनी अडवणूक करून येणाऱ्या 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती करिता वर्गणी म्हणून 21 हजार रुपये दे अशी जबरदस्ती करून न दिल्यास वार्डात राहू देणार नाही हाकलून देऊ असे बोलत वर्गणी देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने सुभाष ऊर्फ विठ्ठल श्रीराम मोरे यास लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व तुला पाहून घेऊ अशी धमकी देत त्याठिकाणी पडलेला लोखंडी रॉड (पाईप) उचलून डोक्यात मारून दुखापत केली .याप्रकरणी सुभाष मोरे याने फिर्याद दिल्यावरुन बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग-5 गुरुन 70/20 कलम 324, 341, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोकॉ नेव्हील बाटली करीत आहे.



