पुरनाड चेक पोष्ट वरील पंटर सह अवैध ओव्हरलोड वाहतूक बंद करा – पुरनाड वासीयांची मागणी

मुक्ताईनगर : महाराष्ट्र व मध्यप्रदेश च्या सीमारेषेवर इंदोर – औरंगाबाद (संभाजीनगर) महामार्गावर मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड शिवारात उपप्रादेशिक परिवहन विभागाचा सीमा शुल्क (चेक पोष्ट) तपासणी नाका आहे . या नाक्यावरून दररोज हजारो वाहनांची ये जा असते . त्यामुळे ओव्हरलोड वाहनांची पंटर करवी तसेच पुरणाड गाव मार्गे चोरटी वाहतूक केली जाते . यातूनच शासनाचा करोडो रुपयांचा महसूल तर बुडतोच शिवाय ज्या चोरट्या वाहतुकीने गाव , शेत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे . तसेच अनेक अपघातांच्या घटनेत गावकऱ्यांनी जीव देखील गमवावा लागत आहे . त्यामुळे येथील पंटर व चोरटी वाहतूक तात्काळ ७ ते ८ दिवसात थांबविण्यात यावी अन्यथा समस्त गावकऱ्यांना प्रचंड आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा असलेले निवेदन गावकऱ्यांनी दि. २८ फेब्रुवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहे .


निवेदनावर गुलाबराव पांडुरंग पाटील , लीलाधर तोताराम पाटील ,अनिल माणिकराव पाटील ,मनोज बाळू पाटील ,प्रमोद मधुकर पाटील ,श्रीकांत गुलाबराव पाटील , प्रकाश पाटील , जगतराव पंडित पाटील , गोकुळ ब्रिजलाल पाटील , बाबुराव जाधव , निवृत्ती वामन पाटील , शुभम रामाभाउ पाटील , अनिल सपकाळे , अतुल जाधव , रामा पाटील , सुरेश पाटील , भागवत पाटील , अनिल आत्माराम पाटील , प्रमोद जाधव , हर्शल पाटील , मुकेश गाढे , एकनाथ पाटील , विनायक पाटील, विश्वनाथ पाटील , प्रभाकर पाटील , विनोद पाटील , रंगलाल कौरे , जयवंत पाटील ,सुनील पाटील माधव ठेलारी , ब्रिजलाल संतोष पाटील यांच्यासह असंख्य गावाकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत .
गावकऱ्यांनी निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , गृहमंत्री अनिल देशमुख , परिवहन मंत्री अनिल परब ,पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले ,आमदार चंद्रकांत पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना देखील दिल्या असून शेवटचा इशारा देत संयमाचा अंत पाहू नका असा खणखणीत इशारा दिला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *