लोणावळा ते शिवाजी नगर दरम्यान ईएमयू लोकल ट्रेनला केंद्रीयमंत्री दानवे पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा ; थाटात उद्घाटन : . .

लोणावळा ते शिवाजी नगर दरम्यान ईएमयू लोकल ट्रेनला केंद्रीयमंत्री दानवे पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा ; थाटात उद्घाटन : . . केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार, यांनी लोणावळा ते शिवाजी नगर दरम्यान ईएमयू लोकल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चेन्नई एक्स्प्रेसचा लोणावळा येथे व कोणार्क एक्स्प्रेसला कर्जत स्टेशनवर थांबा दिला.*

रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाणी राज्यमंत्री, भारत सरकार यांनी दि. ३१.०१.२०२४ रोजी लोणावळा रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोणावळा ते शिवाजी नगर दरम्यान नवीन ईएमयू लोकल ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला.

दानवे यांच्याकडून २२१५७/२२१५८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एग्मोर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेसला लोणावळा रेल्वे स्थानकावर आणि ट्रेन क्रमांक ११०१९/११०२० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेसला कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्याची घोषणा करण्यात आली.

याप्रसंगी श्रीरंग आप्पा बारणे, खासदार (लोकसभा) मावळ, हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.