मयत मल्‍ल आशिक पहेलवान यांच्‍यावर शोकाकुल वातावरणात अंत्‍यसंस्‍कार

भुसावळ (प्रतिनिधी )-
देशभरात मल्ल म्हणून प्रसिध्‍द हाजी आशिक सरदार बागवान पहेलवान यांचा काल दि.२६ रोजी त्यांनीच आयोजित केलेल्या कुस्तीच्या दंगलीत रेफरी म्हणून काम पाहतांना मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
खडका चौफुली जवळील ए.सी.केळागोडावून जवळ दि.२६ फेब्रुवारी रोजी हाजी ईकबाल पहेलवान काटा कुस्तीच्या शानदार दंगलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी कुस्ती सुरू झाल्यानंतर प्रारंभी लहान मल्‍लांच्या जोड लावण्यात आल्या. तीन कुस्त्या झाल्यानंतर अनिल चौधरी यांना रेफरी साठी हाजी आशिक पहेलवान यांनी बोलविले. यानुसार ते रेफरी म्हणून काम पाहू लागले. मात्र काही क्षणातच आशिक सरदार बागवान पहेलवान यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दंगलच्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने पोना.रमेश चौधरी,युवराज अंबोले व त्‍यांच्‍या बंधूसह उपस्‍थितांनी दवाखान्यात उपचारासाठी नेले मात्र काही वेळेतच हाजी आशिक पहेलवान यांचा मृत्‍यू झाला होता. हाजी आशीक पहेलवान हे प्रख्यात मल्ल होते. तसेच ते जनाधार विकास पार्टीचे नगरसेवक इकबाल पहेलवान यांचे बंधू होते. आयुष्यात अनेक दंगली गाजविणार्‍या आशिक पहेलवान यांच्‍या मृतदेहावर आज दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता उर्दू शाळा क्र.३ मध्‍ये नमाज पठन केल्‍यावर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगर सेवक व राज्‍य परराज्‍यातील हजारो मुस्‍लीम व बागवान यांच्‍या उपस्‍थितीत मुस्‍लीम कब्रस्‍तान मध्‍ये दफनविधी(अंत्‍यसंस्‍कार)करण्‍यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *