हिंदी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी यांची जयंती साजरी

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ स्थानकात दरवर्षी प्रमाणे हिंदी साहित्यिक श्री सूर्यकांत निराला त्रिपाठी यांची १२३ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन हिदी पुस्तक विभागाचे अध्यक्ष फरजाना यांनी केले .
दीपप्रज्वलन आणि हिंदी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली. या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती फर्जाना यांनी केले.ज्येष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के.के. शर्मा यांचेसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. प्रसंगी कार्मिक अधिकारी गांगुर्डे, अधिकृत भाषा अधिकारी वाधवे, स्टेशन संचालक अय्यर, स्टेशन व्यवस्थापक मनोज श्रीवास्तव, मुख्य ब्लॉक निरीक्षक सुदर्शन देशपांडे, मुख्य तिकिट निरीक्षक आहुलवालिया, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *