भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील बस आगार व बस स्थानकावर मराठी भाषा गौरव दीन साजरा करण्यात आला .या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी यांचे हस्ते कविवर्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून. आगार व्यवस्थापक पी.बी.चौधरी यांनी प्रवाशांना पेढे वाटप करून मराठी भाषेचे संवर्धन करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला. श्रीकांत जोशी यांनी मराठी भाषेचा वापर घराघरांतून लहान थोर सर्वांनी आवर्जून करावा असे मत व्यक्त केले.बस स्थानकावर रांगोळ्या काढून सुशोभिकरण करण्यात आले होते व ध्वनी क्षेपकावरून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या.या कार्यक्रमासाठी वरिष्ठ लिपिक महेन्द्र सहारे,स्थानक प्रमुख पी.बी.भोई,वरिष्ठ लिपिक पी.टी.चौधरी,कामगार संघटना प्रसिध्दी सचिव धर्मराज देवकर, व पी.एम.पाटील,सुनीता श्रीराम वार,निता कापसे,प्रीती पवार, सुधीर पाटील,जगन गोसावी, प्रवीण टोके,एम.आर.सपकाळे,सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक जी.टी.देवरे,एस.एफ.तडवी , रामकृष्ण सपकाळे यांनी परिश्रम घेतले.



