भुसावळातून ४२ किलो प्लस्टिक जप्त ; १० हजार दंड वसूल प्लॅस्टिक बंदी पथकाची धडक मोहिम

भुसावळ (प्रतिनिधी )-
पालिकेच्या प्लॅस्टिक बंदी पथकाद्वारे भुसावळ शहरात धडक मोहिम राबविन्यात येत असून या पथकाने बुधवार २६ रोजी ४२ किलो प्लॅस्टिक व दहा हजार रुपये दंड वसूल केला आहे . या कारवाई मुळे प्लॅस्टिकचा साठा करून वापर करणाऱ्यां व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे .
येथील नगरपरिषदेच्‍या मुख्याधिकारी सौ .करुणा डहाळे यांचे मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिक बंदी पथकाद्वारे भुसावळ शहरातील बाजारपेठेत व जळगाव रोड परिसरात बंदी असलेल्या सिंगल युज प्लॅस्टिकचा साठा करून उपयोग करणाऱ्या दुकानांवर २६ रोजी सायंकाळी ७. ३० वाजेचे सुमारास छापे टाकण्यात आले.
यामध्ये नितेश अग्रवाल, घाशीलाल वडा समोर जळगाव रोड येथून , 40 किलो प्लास्टिक आणि बजारपेठे मधील सुनील हंसरणी यांच्या दुकानातून 2 किलो प्लास्टिक जप्त केले. या दोघांकडून प्रत्येकी दंड 5 हजार प्रमाणे 10 हजार रुपये ,व 42 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले . या दुकानांमध्ये बंदी असलेले सिंगल युज प्लॅस्टिक आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
भुसावळ शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी बंदी असलेल्या सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर किंवा साठा करू नये असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. यापुढे नगरपरिषदेकडून नियमित धडक मोहीम राबवुन शहरातील सर्वच भागातील दुकानांची तपासणी करून बंदी असलेले प्लॅस्टिकचे साहित्‍य आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी सौ. करुणा डहाळे यांनी सांगितले. या कारवाई पथकात मुख्याधिकारी करुणा डहाळे , पाणी पुरवठा अभियंता नितीन लुंगे, स्वच्छता निरीक्षक प्रदीप पवार, वसंत राठोड,निवृत्ती पाटील,कार्यालय अधीक्षक महेंद्र कातोरे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *