खंडवा स्टेशनवर तिकिट तपासणी; सुमारे दोन लाख दंड वसूल

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे भुसावळ विभागाने भुसावळ विभागाच्या खंडवा स्टेशनवर विना टिकट व अयोग्य तिकीट रोखण्यासाठी दिनांक २४ रोजी किल्ला बंदिस्त तिकिट तपासणी केली.
भुसावळ विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आर के शर्मा आणि सहाय्यक व्यवसाय व्यवस्थापक अजय कुमार (टी. जाजा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी २६ तिकीट तपासणी पथक , ६ आरपीएफ कर्मचारी यांनी केली .
खंडवा स्टेशन वर ३३० प्रवासी अनियमित प्रवास करत असल्याचे आढळून आले.या प्रवाशांकडून एकूण १ लाख ९९ हजार ६६५ इतका दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत विना तिकीट प्रवास करणार्‍यांना ११६ केसेस करून त्यांचे कडून ८७.११५ / -रुपये दंड वसूल केला तर अनियमित प्रवास करणाऱ्यां २१४ प्रवासी कडून १लाख १२हजार ५५०रुपये दंड आकारण्यात आला . दंड भरण्यास असमर्थ असणार्‍या ४ प्रवाशांवर कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात आली तर दंड भरण्यास असमर्थ २ प्रवाशां विरुद्ध कलम १४५ ब अन्वये कारवाई करण्यात आली .
-या मोहिमे मध्ये मुख्य तपासणी तिकिट निरीक्षक वाय.डी. पाठक यांच्यासह एटीएस पथक, फिर्यादी पथक, आयसीपी चेक, सजंग पथक, ओडी स्टाफ आणि इतर तिकिट तपासणीस कर्मचारी उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाचे वतीने प्रवाशांना नेहमीच योग्य तिकिट घेऊन प्रवास करण्याची विनंती केली आहे

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *