वरणगावात स्वामी समर्थ मंदीर सभागृहाचे भुमीपुजन संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवजयंती निमित्त
वरणगांव नगरपरिषदेतील वार्ड क्र.९ मधील श्री.स्वामी समर्थ मंदीर सभागृह बांधकामांचे भुमीपुजन संपन्न झाले .
श्री.स्वामी समर्थ मंदीर येथील हे सुमारे ७३ लाख ६९ हजार रुपये किंमतीचे सभागृह बांधकाम असून या कामास शिवसेना नगरसेविका सौ.शशी संजीव कोलते यांचे अथक प्रयत्न लाभले .
यावेळी नगराध्यक्ष सुनिल काळे ,उपनगराध्यक्ष शे.अखलाख शे.युसुफ, कॉस्ट्राइब कामगार संघटनेचे मिलिंद मेंढे, नगरसेविका सौ.मालाताई मेंढे ,सौअरुणा शामराव इंगळे,सौ.रोहीणी सुधाकर जावळे, सुधाकर जावळे, राजेंद्र चौधरी , इरफान पिंजारी तसेच वार्डातील जेष्ठ नागरिक तसेच शेंकडों तरुण व महीलांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *