भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगावच्या शिरसोली (प्र.बो.)येथील बेलविक्रीचा व्यवसाय करणारी ५० वर्षीय महिला भुसावळातून बेपत्ता झाल्याने भुसावळ बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी सावळे यांचा मुलगा शशीकांत भिवा सावळे याने भुसावळ बाजारपेठ पोलिसात अंजनाबाई भिका सावळे (५०) ही महिला
अंजनाबाई या मैत्रीणीसोबत बेल विक्रीसाठी २० रोजी भुसावळहून रेल्वेने नाशिक येथे गेल्या मात्र २१ रोजी परत आल्याच नाहीत म्हणून खबर दिल्यावरुन बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार माणिक सपकाळे करीत आहेत.



