पाल येथे बाॅक्‍सींग शिबीराचा समारोप

भुसावळ (प्रतिनिधी )-
सातपुडा पर्वतातील पाल येथे कॅशियस स्पोर्ट्स अॅकेडमी तर्फे व तालुका बॉक्सिंग असोसिएशनच्‍या सहकार्याने दि.१५ ते २२ फेब्रुवारी पर्यंत बाॅक्‍सिंग शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. या शिबिरात कब क्लास,सब ज्‍युनियर,ज्‍युनियर, युवा व एलिट वर्गाच्‍या मुले व मुली बाॅक्‍सिंगपटूंनी सहभाग घेतला होता. या शिबीरात बॉक्सिंग खेळ प्रकारात आवश्यक विषयांवर प्रशिक्षण देण्‍यात आले. ज्‍यात इंडोरनस, स्ट्रेंथ, स्पीड, फ्लेगजिबिलिटी,मोटिवेशन,योगा, मनोवैज्ञानिक,ध्यान केंद्रित, टेक्निक,टैक्टिस व स्कूल बॉक्सिंग,स्कूल फाइट आणि फ्री स्पायरिंग इत्यादी विषयांवर प्रशिक्षण व प्रात्यक्षिके करवण्‍यात आले.शिबिरातील खेळाडूंना गावातील हकीम चाचा तर्फे मोफत औषधोपचार सुविधा देण्‍यात आली. सोबतच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले, मुख्य प्रशिक्षक राहुल घोडेस्वार, सी.आर. गुप्ता, सहायक प्रशिक्षक सुनील नवगिरे,पवन सिरसाट, मनोज सुर्यवंशी यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले.शिबीर यशस्‍वीतेसाठी दीपक शंकुपाड़े, प्रवीण मोरे,सुंदर बारसे,किरण कंसे, सुबोध गवली,अनिल इंगले, पीटर,अजय देवरे,मेघराज तल्लारे, सिद्धार्थ धीवरे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *