भुसावळ (प्रतिनिधी )-
मॉर्निंग वॉकसाठी घरा बाहेर जाणाऱ्या महिलेच्या घरात घुसून अज्ञात चोराने मोबाईल लंपास करून पोबारा केल्याची घटना रविवारी २३ रोजी येथे घडली . या बाबत महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीस पोलिसांनी त्वरीत जेरबंद केले .
श्रीमती छाया नारायण पाटील रा.भिरुड हाॅस्पिटल मागे जामनेर रोड भुसावळ या दररोज सकाळी 5 ला माॅर्निग वाॅकला जाण्यासाठी तयार झाल्या व त्यानी घराचे दार उघडले आणि आवराआवर करत असतांना अचानक कोणी तरी चोरट्याने त्यांचे घरात प्रवेश करुन त्यांचे बेड वरील उशी खाली ठेवलेला ( Itell ) आयटेल कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट चोरुन नेला या बाबत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली यावरुन बाजारपेठ पोलिस ठाण्यात भाग 5 गुरन 0061/2020 भादवी कलम 380 प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली की भुसावळ बस स्टॉप परीसरात एक इसम मोबाईल ची विक्री करण्यासाठी फिरत आहे.यावरुन गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरीत तेथे जाऊन सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेवुन पो.स्टे.ला आणले त्याचे कडे विक्रीस असलेला मोबाईल बाबत विचार पुस केली असता त्याने तो महिलेचा मोबाईल चोरल्याचे कबूल केले . आरोपी नाव विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण वय-20 रा.शनी मंदिर मागे सोनिच्छा वाडी जामनेर रोड भुसावळ यास सदर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले .
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डाॅ.पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अनिल मोरे, स.फौज.तस्लिम पठाण, पो.ना. रमण सुरळकर,उमाकांत पाटील, महेश चौधरी,तुषार पाटील,संदेश निकम,समाधान पाटील, पो.काॅ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी,सुभाष साबळे,सुनिल सांळुखे यानी केली . पुढील तपास पो.हे.काॅ. मिलिंद कंक हे करीत आहेत.



