भुसावळ (प्रतिनिधी )-
पोलिस ठाण्यास ठरवून दिलेल्या हद्दी च्या वादात न अडकता माणुसकी हा धर्म जोपासत क्षणाचाही विलंब न लावता अपघाताचे वृत्त समजताच आपल्या सहकारी व कर्मचार्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेवून जखमी व्यक्तिस उपचारार्थ रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राण वाचविले.या घटनेमुळे येथील बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यामधील ख़ाकीतील माणुसकीचे दर्शन शहरवासीयांनी अनुभवले .
या बाबत असे की राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ २४ सोमवार रोजी सकाळी ११ वाजेचे सुमारास समोरून येणाऱ्या वाहनाने एका ट्रालीस कट मारला यामुळे ट्रॉली वरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व ट्राली उलटून पुला खाली कोसळली. यात
एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला .
हा अपघात शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत झाला नियमाने या ठिकाणी शहर पोलिसांचे कार्य आहे तरीही घटनेची माहिती मिळताच हद्दीच्या वादात न अडकता बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी आपल्या सहकार्यां सह घटनास्थळी धाव घेवून प्रथम जखमीला रूग्णालयात पाठविण्यासाठी मदत केली. यामुळे जखमीचे प्राण वाचले . पो नि भागवत यांची कार्यतत्परता बघून उपस्थितांनी कौतुक केले .
यातील मृताची ओळख अद्याप पटली नसून या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.




