बोदवड – येथील बोदवड एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास कक्षाद्वारे प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान सोबतच प्रथम वर्ष पदुत्तर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी दिनांक 26 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. प्रसंगी तुलसी हॉस्पिटल बोदवड येथून डॉ. राजेंद्र कोळंबे आणि निरामय सुपर स्पेशलिटी होमिओपॅथी क्लिनिक बोदवड येथून डॉ. प्रशांत बडगुजर उपस्थित होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान तसेच प्रथम वर्ष पद्युत्तर कला, वाणिज्य व विज्ञान वर्गांच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आजारांची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेतली जाते. त्यात हृदय व रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, त्वचा, पोट, लघवी, कान, घसा, नाक, डोळे, दात, मासिक पाळी, लिंग इत्यादी तपासण्या करून डॉ. राजेंद्र कळंबे, तुलसी हॉस्पिटल, स्टेशन रोड, बोदवड आणि डॉ. प्रशांत बडगुजर, निरामय सुपर स्पेशलिटी होमिओपॅथिक क्लिनिक, मलकापूर रोड, बोदवड यांनी विद्यार्थ्यांच्या विविध आजारांशी संबंधित सर्व शंकांचे निरसन केले आणि उपाय देखील सुचविलेत.
वैद्यकीय शिबिरामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैद्यकीय तपासणी शिबिर सुरळीत पार पाडण्यासाठी माननीय प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी विकास महिला अधिकारी डॉ. रूपाली तायडे यांनी आभार प्रदर्शन केले तर विद्यार्थी विकास सहाय्यक अधिकारी डॉ. मनोज निकाळजे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भाग्यश्री चौधरी, प्रा. कमलाकर कापसे, प्रा. शरद पाटील, अतुल पाटील जितेंद्र बडगुजर, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिबिर यशस्वीते करता सहकार्य केले.



