भुसावळ
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नुकतेच वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी येथील शिवमंदिर जवळील जागेवर देशी वृक्ष निम शिसम आंबे करंज चिंच ताम्हण असे ११० वृक्ष माननीय आमदार संजय भाऊ सावकारे वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरीचे जनरल मॅनेजर अजित कुमार सिंग, ए के गुप्ता,एम जे शिंदे पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील सर सामाजिक वनीकरणाच्या आरएफओ प्रणाली धर्माळे वनपाल सुनील पवार संजय धनगर सुरेंद्र सिंग पाटील तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते व वन विभागाचे कर्मचारी या सर्वांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना आमदार संजय भाऊ सावकारे म्हणाले वृक्ष लावणे सहज आहे पण त्याचे संवर्धन आणि संगोपन करणे तितकेच आवश्यक आहे सर्वांनी वृक्ष लावताना ती संगोपनाची जबाबदारी घ्यावी .असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी चे जनरल मॅनेजर अजित कुमार सिंग यांनी सामाजिक वनीकरण विभाग व पर्यावरण जागर प्रतिष्ठानने केलेला वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे .या वृक्षांचे संगोपन संवर्धन आमच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत केले जाईल त्या ठिकाणी तयार केलेल्या तलावातून पाण्याची व्यवस्था या झाडांना करण्यात येईल असे त्यांनी या प्रसंगी सांगितले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचा परिचय नाना पाटील सर यांनी केला वृक्षारोपणाच्या संदर्भात शासनाच्या योजना बाबत माहिती भुसावळ विभागाच्या आरएफओ प्रणालीताई धर्माळे यांनी दिली .वनपाल सुनील पवार यांनी उपस्थितीताचे आभार मानले .वनविभागाचे कर्मचारी संजू भाऊ धनगर व इतर सर्वांनी यासाठी सहकार्य केले .



