भुसावळ – वरणगाव आयुध निर्माणीत तयार होणाऱ्या बंदूकीच्या गोळी तयार करताना वापरले जाणारे पितळी (ब्रास ) कप अबरनाथ येथून वरणगाव आयुध निर्माणीत जात असताना वाटेतच राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चंदन जवळ गाडीतून सुमारे पंचवीस हजार रुपये किंमतीचे पन्नास किलो ग्रॅम पितळी (ब्राप ) कप चोरल्याची घटना घडली असून चालका सह एकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे

या बाबात पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की आयुध निर्माणीत बंदुकीच्या गोळ्या तयार करताना वापरण्यात येणारे पितळी (ब्रास ) कप अबरनाथ आयुध निर्माणीतून ट्रक क्र एम एच १९ सी वाय ८०५७ या गाडीने नवीन चौपदी राष्ट्रीय महामार्गा वरून वरणगाव आयुध निर्माणीत येत असताना शहरा जवळील हॉटेल चंदन जवळ उभी करूण चालक श्रीकांत निवृती लढे (६२ ) रा. भुसावळ , राकेश सोपान चौधरी , विनायक भरत भंगाळे दोघ रा वरणगाव आशानी संगणमत करून गाडीतील ५० किलोग्रॅम वजनाचे २५००० रु किंमतीचे पितळी ब्रास कप चोरले हि बाब आयुध निर्माणीचा सुरक्षा रक्षक सैफलइस्लाम सुभान शेख यांनी गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीची ताडपत्री उचकल्याने लक्षात आल्याने आयुध निर्माणी प्रशासना माहीती देली
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशना सुरक्षा रक्षक सैफल इस्लाम यांच्या फिर्यादी वरून सशयीत गाडी चालक श्रीकांत निवृती लढे , राकेश सोपान चौधरी , विनायक भरत भगाळे यांच्या विरोधात भा द वी कलम
३७९ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास उप निरिक्षक शे इस्माईल शेख हे करीत आहे


