भुसावळ – वरणगाव नगरपरिषदच्या माध्यमातुन २५ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले काम पूर्णता अनियमित आणि दर्जाहीन निकृष्ट अशा दर्जाचे होत असल्याने तरी देखील प्रशासन स्तरावरून वेळोवेळी सदर कंत्राटदाराची पाठ राखण केली जात आहे. हे निकुष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे. या मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )
तर्फे दि. ३० जून शुक्रवारी रोजी प्रांत कार्यालय येथे जिल्हाधिकारी अमन मित्तल हे तालुक्याच्या आढावा बैठकीसाठी आले होते. तेव्हा त्यांना वरणगाव शहर शिवसेनेतर्फे शहरप्रमुख संतोष माळी, उपशहरप्रमुख सुनील भोई यांनी निवेदन दिले.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे की, मुदत संपूनही सदर कंटाळास वारंवार मदत वाढ दिली गेली आहे. त्यासाठी कोणताही दंड आकारला गेला नाही, किंवा कार्यवाही केली गेली नसल्याचे दिसून आले आहे.
तांत्रिक आराखड्याप्रमाणे जलवाहिनी ही एक मीटर ऐवजी केवळ एक फूट इतक्या खोलीवर टाकण्यात येत आहे. ज्याचे थेट पुरावे सोशल मीडियात आणि नागरिकांच्या प्रत्यक्षात पाहण्यात आले आहे. पाईपलाईनच्या खाली कोणतेही मुरुमची लेव्हलिंग केलेली नाही. प्रस्तावित नकाशा प्रमाणे पाईपलाईन केलेली नाही. जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेचा फायदा घेऊन हे निकृष्ट कामे केली जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खोदकाम करून पाईप टाकून झाल्यावर कोणतीही दवाई केली गेली नाही. ज्यामुळे मातीचे ढीग होऊन पावसात सर्व रस्ते चिखलमय होऊन दुचाकी वाहने आणि नागरिकांना त्यामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.
पाण्याच्या टाक्या प्रस्तावित जागेवर इतर ठिकाणी बांधल्याने प्रवाह प्रभावीत होऊन भविष्यात अडचण निर्माण होणार आहेत. शहरात मंजूर आणि कार्यारंभ आदेश निघालेले विकास कामे संबंधित कंत्राटदारामुळे अद्याप सुरुवात करता येत नाही आहे.
वरील प्रमाणे प्रथमदर्शनी समोर येत असलेली कंत्राटदाराची अनियमतता निकृष्ट कार्यवसान पद्धती, संथतीने सुरू असलेले काम यामुळे सदर योजनेस पूर्ण करण्याचा अक्षम्य असा वेळ लागलेला आहे. आणि वरणगावकरांचा पाणी प्रश्न अद्यापही सुटू शकलेला नाही आहे. या सर्व बाबींचा काम वीर्यपूर्वक विचार करून संबंधित कंटक दरावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून त्याच काळ्या यादीत समाविष्ट करावे व शासकीय रकमेची वसूली करून इतर कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्याबाबत विचार करावा. करून वरणगावकर जनतेसाठी योजना व पाणी प्रश्न हा संवेदनशील विषय असून वरील प्रमाणे मागणीस योग्य तो प्रतिसाद मिळून आपल्या स्तरावरून कार्यवाही न झाल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने याचा विचार करेन तसेच कायदा सुव्यवस्थचां प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. नाही निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, उपशहर प्रमुख सुनील भाई यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


