भुसावळ – शहर शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
भुसावळ येथे प्रांताधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आज दिनांक ३० रोजी आले असता शिवसैनिकांनी त्यांची भेट घेतली व त्यांना शहरातील समस्यांबाबत निवेदन दिले .
भुसावळ शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून अमृत योजनेचे काम सुरू आहे ८५ कोटीची योजना आज २५० कोटी ची झालेली आहे तरी सुध्दा फक्त पाईप लाईन टाकून झालेली आहे ते सुध्धा काही भागातच ज्या भागात पाईप लाईन टाकली गेली आहे तेथे काँक्रिट चे रस्ते तयार करण्यात आलेले आहे कोणत्याच ठिकाणी नागरिकांना नळाचे कनेच्षण बाहेर काढलेले नाही ,म्हणजे पुन्हा अमृत चे पाणी सुरू झाल्यावर पुन्हा हे तयार केलेले रोड फोडण्यात येतील आणि जनतेचा पैसा पाण्यात जाईल याला जबाबदार कोण तसेच शहरात अमृत च्य पाण्याची टाकीचे काम अपूर्ण आहे त्या कडे सुध्धा आपण लक्ष घालून भुसावळ कर जनतेला न्याय द्यावा
२)तसेच पावसाळा सुरू झालेला असून नाले सफाई ची कामे फेल झालेली आहे फक्त एका j c b च्या सहायाने नाले सफाई सुरू आहे नाले सफाई करायला पोकल्यांड ची आवश्यकता असताना वरच्या वर j c b च्या सहायाने नाले सफाई सुरू आहे व फक्त बील लाटण्याचे काम सुरू आहे
३)न पालिका दवाखान्यांमध्ये कोणतीही सुविधा मिळत नाही तेथे औषधी नाही पुरेसा स्टाफ नाही तेथील डॉ तेथे पेशंट आल्यावर त्याला ट्रॉमा केअर सेंटर ला पाठवितात परंतु
लाखो रु खर्च करून ट्रॉमा केयर सेंटर सुरू झाले आहे परंतु तेथे कोणतीही सुविधा नाही पुरेसा स्टाफ नाही साफ सफाई करायला कर्मचारी नाही
या कडे आपण लक्ष द्यावे
४)भुसावळ शहरात वाहतूक सिग्नल यंत्रणा धूळ खात पडलेली आहे त्यामुळे भुसावळ शहरात रोजच अक्सिडट होत आहे तरी सिग्नल यंत्रणा सुरू करावी
६)प्रभाग क्र १३ चे नगर सेवक मुकेश गुंजाळ यांनी आपल्या वॉर्डातील अंडर ग्राउंड गटार चा प्रस्ताव नगर पालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे परंतु जिल्हा नियोजन मार्फत अजूनही त्या प्रस्तावाला निधी दिला जात नाही आहे या कडे पण आपण लक्ष घालावे व निधी मंजूर करून द्यावा
७)भुसावळ शहरात दिवसा पथदिवे सुरू आसतात व रात्री बंद असतात नगर पालिका म्हणांते ती m a c b ची जबाबदारी व m a c b म्हणते नारपालिकेची जबाबदारी नेमकी कोणाची जबाबदारी ही नीचीत करावे
८)तसेच भुसावळ शहरातील गरीब व गरजू लोकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे अशा हजारो बेघर नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी नगर पालिकेत अर्ज केलेले आहे पण अजून हि कोणतीही प्रक्रिया यावर होताना दिसत नाही आपण स्वतः लक्ष घालून या नागरिकांना न्याय द्यावा
१०)भुसावळ शहरात नगर पालिका प्रशासन असताना शहरातील कामे ही p w d च्या मार्फत केली जातात त्याकडे कोणताही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही फक्त बील काढण्याचे काम सुरू आहे
रस्ते ६ _६ महिन्यात खराब होत आहे परंतु शासन याकडे कोणतेही लक्ष द्यायला तयार नाही फक्त त्यांचे कमिशन कडे यांचे लक्ष आहे
११) तसेच भुसावळ शहरात भटके कुत्रे सुध्धा खूप झालेले आहे गेल्या काही दिवसांमध्ये दोन नागरिक ह्या कुत्र्यांच्या हल्यात जखमी झाले होते यांचा सुध्धा बंदोबस्त करावा.
आपण या सर्व समस्यांवर लक्ष घालून भुसावळ शहरातील नागरिकांना न्याय द्यावा आदी मागण्या केल्या आहेत .
यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे,नगरसेवक मुकेश गुंजाळ,हेमंत खंबायत,रहीम गवळी,गोकुळ बाविस्कर,स्वप्नील सावळे,राजू इंगळे,दिलीप सुरवाडे व शिवसैनिक उपस्थित होते .



