महाशिवरात्री निमित्तानं नुपूर महोत्सव चे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील नुपूर कथक डान्स अॕकेडमी च्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्ताने नुपूर महोत्सव चे आयोजन शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२०रोजी कृष्णचंन्द्र सभागृह येथे सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे. हा महोत्सव शास्त्रीय नृत्याचा ओळखला जातो. यात विविध शास्त्रीय नृत्य प्रकार सादर केले जातात.हे महोत्सवाचे तेवीसावे वर्ष असुन आतापर्यंत यात कथक सोबतच भरतनाट्यम, ओडीसी, कुचीपुडी, हे प्रकार सादर करण्यात आले. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे नुपूर अॕकेडमी च्या त्रेचाळीस विद्यार्थ्यांच्या कथक नृत्यासोबत कोलकाता ( पश्चिम बंगाल ) येथील कलावंत कथकली व मणिपुरी नृत्य सादर करणार आहेत. सायंकाळी सात वाजता कार्यक्रम सुरु होईल.
अंशुमन गुप्ता यांना नृत्यश्री पुरस्कार घोषित
दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर शास्त्रीय नृत्यात वैशीष्टपूर्ण कामगीरी करणार्या कलावंतास हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.या वर्षीचा पुरस्कार कोलकाता येथील कथकली नृत्य करणारे श्री अंशुमन गुप्ता यांना घोषित करण्यात येत आहे. या पुरस्कार स्वरुपात शाल,श्रीफळ व मानपत्र देउन गौरवण्यात येते.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
दरवर्षी प्रमाणे यंदाही नुपूर कथक डान्स अॕकेडमी च्या वतीने होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घोषित केली जाणार आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी आयोजक परिश्रम घेत आहेत. आशा या आगळ्यावेगळ्या काय्यक्रमाचा आस्वाद सर्व रसिक नागरिकांनी घ्यावा आसे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.या महोत्सवाला कुठलेही शुल्क नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *