भुसावळ (प्रतिनिधी )-
सर्वांना शिक्षणाचे डोस पाजणाऱ्या शिक्षण विभागालाच सामान्यज्ञान शिक्षणाचे डोस पाजवण्याची गरज आहे कारण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या व उच्च शिक्षण संचनालाय संकेत स्थळावर अद्यापही मुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती झळकत आहे. यामुळे शिक्षण विभागाचे अजूनही भाजपप्रेम कमी न झाल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व उच्च शिक्षण संचनालाय यांच्या संकेतस्थळावर अद्यापपर्यंत जुनीच माहिती आहे ही माहिती वेळोवेळी अपडेट करण्याची गरज असतानाही अद्यापपर्यंत ही माहिती अपडेट करण्यात आली नाही शिक्षण विभागाला मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री कोण आहे, हे माहीत नसेल तर ही गंभीर बाब आहे.
यामुळे सत्तापालट होऊनही शिक्षण विभाग हा भाजप प्रेमातून बाहेर पडलेला नाही राज्यात सत्तापालट होऊन आघाडी सरकारची सत्ता स्थापन झाली असून, आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत राज्यात सत्तापालट झाले तरी शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या व उच्च शिक्षण संचनालाय संकेतस्थळावर आजही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची माहिती दाखवली जात आहे याचबरोबर शिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे यांची माहिती दाखवली जात आहे तसेच आयुक्त, सचिवपदीही जुन्याच अधिकाऱ्यांची माहिती आहे. याबाबतीची लिंक खाली दिलेली आहे.तसेच संकेतस्थळावर अजूनही सायन्स विभागाच्या ११ वी व १२ वीचा अभ्यासक्रम जुनाच असून अनुदानित महाविद्यालयातील खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांसाठी तो अपलोड करण्यात आलेला नाही. विभागातर्फे नवीन अभ्यासक्रम असलेल्या १२ सायन्सची पुस्तके प्रकाशित झाली नाही कारण खाजगी शिकवणी असलेल्या शिक्षकांकडे विद्यार्थ्यांनी शिकवणी लावावी असे संगमताने ठरले असल्याची शंका आहे.
याबाबतची माहिती युवासेना भुसावळ तर्फे शहर प्रमुख सुरज पाटील यांच्या कडून कळविण्यात आली होती. संकेतस्थळावरील माहिती अपडेट करण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांना सांगितले होते परंतु एक आठवडा उलटूनही त्यात बदल दिसून आलेला नाही म्हणून सदर अधिकारी यांच्यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी युवासेना भुसावळ तर्फे करण्यात येत आहे.



