नवजीवन एक्सप्रेस मधून मोबाईल चोरी :

भुसावळ – मध्य रेल्वे विभागातील बडनेरा रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी ट्रेन नंबर १२६५६ अप नवजीवन एक्सप्रेस कोच नंबर ८/२ बर्थ नंबर १४ वरील प्रवाशी सैय्यद मोहम्मद अली राहणार ४७/१ ,मंजला नारायण गुरू रोड साईबाबा कॉलनी, तामिळनाडू हे प्रवास करीत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने सॅमसंग कंपनीचा मॉडेल एस -९ अल्ट्रा जिओ स्कीम ९९ ९४ ५४ ९८ ६८ या क्रमांकाचा एक लाख २० हजार रुपयांचा मोबाईल चोरी नेला म्हणून रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन भुसावळ येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून बडनेरा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.