गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात भुसावळ राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने अनोखे आंदोलन ; चुली पेटवून केल्या भाकरी ; केंद्र शासनाचा तिव्र निषेध; तहसिलदारांना दिले निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी )-
केंद्र शासनाने गॅस सिलेंडरच्या किंमतीत दरवाढ केल्याने या दरवाढी विरोधात भुसावळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलां आघाडी तर्फे गुरुवार दिनांक १३ रोजी तहसील कार्यालयासमोर महिलांनी चुलीवर भाकरी करून केंद्र शासनाचा तिव्र निषेध केला .
केंद्र सरकारने घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मध्ये दरवाढ केली असून केंद्र शासनाने केलेल्या या निर्णयाचा येथील राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टीतर्फे तिव्र निषेध करण्यात आला असून याबाबत रॉ कॉच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटिल व शहराध्यक्षा नंदा निकम यांच्या नेतृत्वात तहसिलदार दीपक धीवरे यांना निवेदन देण्यात आले .
निवेदनात नमूद केले आहे की, नुकतेच केंद्र शासनाने घरगुती एल. पी. जी. गैस सिलेंडर चे दर ११४.५० रूपयांनी वाढवून सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आधीच महागाई, महागाई, केंद्र शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरनामुळे भारताचा विकास दर कमी होत असुन या दरवाढीत पुन्हा सर्व सामान्य जनता रखडली गेलेली आहे. केंद्र शासनाने केलेली दरवाढ ताबडतोब मागे घेण्यात यावी, या दरवाढीचा जाहिर निषेध केला असुन अशी दरवाढ होत राहिली तर सर्व सामान्य जनता रस्त्यावर उतरून केंद्र शासनाला खुर्चीवरुन खाली खेचण्यात मागे राहणार नाही.असा खणखणीत इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
यावेळी रॉ कॉ महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटिल, शहर अध्यक्ष सौ नंदा निकम, मीनल पाटिल , मीनाक्षी चव्हाण , जयश्री पाटिल, अर्चना कदम , ममता तड़वी , शकीला तड़वी , शोभा भोईटे , आशा अंभोरे, आशा चावरिया, पिनाझ फनीबंदा , कमल पाटील, ताराबाई मोची , सुनंदा बगाडे, यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *