भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील कै. यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी, साकेगाव येथे न्यु रेग्युलेशन फॉर बी.फार्मसी एम.फार्मसी सिलेबस ऑफ पी सी. आय, न्यु दिल्ली अॅण्ड ऐनी सजेशन इन देअर ऑफ या विषयावर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते .
या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील कार्यकारी
समिती सदस्य औषधनिर्माण शाळा परिषदेचे डॉ. एम.डी.कर्वेकर उपस्थित होते. तसेच, शास्त्री इन्टीट्युट ऑफ फॉमसी, एरंडोलचे प्राचाय डॉ.व्ही. एम. शास्त्री व देवकर कॉलेज ऑफ फार्मसी, जळगावचे प्राचार्य डॉ. योगेश पवार ,तसेच प्रमुख संस्थेचे अध्यक्ष पी .डी.सराफ व
सहसचिव एस.पी. इंगळे होते. प्राचार्य डॉ. पी.आर.पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.सौ. एस.पी.वारके यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध फार्मसी कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक हे उपस्थित होते. यावेळी डॉ. एम.डी.कर्वेकर यांनी आपल्या भाषणात पी. सी. आय अंतर्गत
घेण्यात आलेल्या विविध नवीन उपक्रमाबददल जसे सुपर स्पेशलिटी कोर्सेस Superspeciality Courses तसेच नवीन नियमांबद्दल माहिती
दिली. बी. फार्मसी, एम फार्मसी कोर्सेसचा 2017 मध्ये
पी.सी.आय अंतर्गत नवीन अभ्यासक्रम लागु करण्यात आला. यावेळी असलेल्या प्राध्यापकांनी पीसीआय
च्या नवीन सिलेबस मधील विविध अडचनीं व त्रुटी
यांविषयी चर्चा केली. प्राध्यापकांना आणि विदयार्थ्याना
सिलेबस विषयी पडलेल्या प्रश्नांची उत्तरे कर्वेकर यांनी दिली. यावेळी , प्राध्यापकांनी विदयार्थ्यांच्या भविष्याच्या
दृष्टीने फायदेशीर असलेल्या गोष्टी सिलेबस मध्ये समावेश
करण्यासाठी उपाय सुचवले. यावर कर्वेकर सरांनी सत्रातील
मुद्दे पीएसीआय समोर ठेवण्याची हमी दिली. प्राध्यापक डॉ. भारती बाकडे, यांनी आभार प्रदर्शन केले.



