भुसावळात अज्ञाताने दुचाकी जाळली ;

भुसावळ (प्रतिनिधी) –
येथील पंचशील नगरात घरासमोर उभी असलेली दुचाकी मोटरसायकल कोणीतरी अज्ञाताने जाळल्याची घटना येथे सोमवार( ११) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली .
शहरातील पंचशील नगर भागातील रहिवाशी रईस गफूर तडवी यांची मोटरसायकल एम.एच.19 सी.डी.0204 क्रमांकाची फॅशन प्रो.कंपनीची दुचाकी घराजवळ लावली होती .
मध्यरात्री ३ वाजेचे सुमारास कोणीतरी अज्ञाताने बिडी,काडी पेटवून मोटरसायकल जाळण्याचा प्रयत्न केला . यामध्ये फिर्यादीचे सुमारे तीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याची फिर्याद रईस गफूर तडवी यांनी दिल्यावरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस अज्ञात इसमाच्या विरुद्ध गु.र.न.48 /2020 कलम 435 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शानाखाली पोहेकॉ मिलिंद कंक करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *