मुंबई -नागपूर- नासिक रोड दरम्‍यान ५ अतिजलद विशेष गाड्या धावणार.

भुसावळ-
मध्य रेल्‍वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी बघता मुंबई – नागपूर आणि नासिक रोड –नागपुर दरम्‍यान ५ अतिजलद विशेष रेल्‍वे गाड्या चालविण्‍याचा निर्णय घेतला आहे.
या गाड्‍यांचा विवरण खालिलप्रमाणे
०२०३१/०२०३२छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपुर अतिजलद विशेष (२फेरी )
गाड़ी क्रमांक ०२०३१ डाऊन अतिजलद विशेष छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि.१५ फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारी रोजी १२-२०वाजता सुटेल आणि त्‍याच दिवशी २-१० वाजता नागपुर येथे पोहचेल. ( २फेरी )
गाड़ी क्र.०२०३२ अप सुपरफास्‍ट विशेष नागपुर येथून दि.१६ फेब्रुवारी रोजी ३-३० वाजता सुटेल आणि दूस-या दिवशी ६-१५ वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहचेल. (फक्‍त १ फेरी )
या गाड्‍या मार्गात दादर,ठाणे, कल्‍याण,इगतपुरी,नासिक रोड, भुसावळ,मलकापुर,शेगाव, अकोला,मुर्तिजापुर,बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्‍थानकांवर थांबा राहील.
यात १५ शयनयान आणि २ सामान्‍य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
तर ०२०३३/०२०३४ नासिक रोड-नागपुर सुपरफास्‍ट विशेष (१ फेरी )
गाड़ी क्रमांक ०२०३३ डाऊन अतिजलद विशेष नासिक रोड येथून दि.१६ फेब्रूवारी रोजी ४-३० वाजता सुटेल आणि त्‍याच दिवशी ३-१० वाजता नागपुर येथे पोहचेल.
गाड़ी क्रमांक ०२०३४ अप अतिजलद विशेष नागपुर येथून दि.१५ फेब्रुवारी रोजी ४ वाजता सुटेल आणि दूस-या दिवशी ४ वाजता नासिक रोड येथे पोहचेल.
या गाड्‍यांना मनमाड, भुसावळ,मलकापुर,शेगाव, अकोला,मुर्तिजापुर,बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे राहतील.
तर १५ शयनयान आणि २ सामान्‍य द्वितीय श्रेणी डबे असतील.सुपरफास्ट विशेष गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कसह सर्व रेल्‍वे आरक्षण केंद्र आणि आयआरसीटीसीच्‍या वेबसाइटवर दि.१३ फेब्रुवारी पासून काढता येतील. या विशेष गाड्यांचे सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डब्‍यांच्‍या स्‍वरूपात चालविण्‍यात येतील आणि सुपरफास्‍ट मेल/एक्‍सप्रेस गाड्यांसाठी लागू दराने बुकिंग यूटीएस प्रणालीच्‍या माध्यमातून करता येईल असे भुसावळ रेल्‍वे वाणिज्‍य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *