भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य व त्यामुळे झालेली अस्वच्छता यामुळे दुर्गंधी पसरली असून विविध आजारांनी नागरिकांचे स्वास्थ बिघडत आहे .वारंवार तक्रारी व निवेदन देवून देखील पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे पालिकेस या कुंभकर्णी झोपेतुन जागे करण्याकरीता येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लक्ष वेधण्याकरीता अनोखा उपक्रम करीत एका खड्ड्याच्या साचलेल्या घाण पाण्यात भोपळयाचे विसर्जन करून भारतीय जनता पार्टिचा निषेध व्यक्त करण्यात आला.
शहराच्या मध्यभागी जामनेर रोड वर स्व.मोटू शोभराज चौकात मागील तीन वर्षापासून एक मोठा खड्डा पडलेला आहे गटारीची बिकट अवस्था झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचलेले आहे.पालिकेतील नगराध्यक्ष रमण भोळे व संबंधित याच्या कडे तक्रारि केल्या परंतु दुर्लक्ष करीत असल्याने या गटारीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवार ११ फेब्रूवारी रोजी भोपळयाचे विसर्जन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन धांडे,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित गटनेते व नगरसेवक दुर्गेश ठाकूर, उल्हास पगारे,हाजी आशिक खान, तम्मा पहेलवान,राहुल बोरसे,राहुल वाघ, विक्की चौधरी, हर्षल पाटील,संगीत खरे,सोनू चाबुकस्वार, जगदीश वाघ तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.



