जनमत प्रतिष्ठान कडून करियर महोत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा जल्लोषात साजरा :-

जळगाव –
दरवर्षीप्रमाणे वर्ष 3रे सरदार पटेल सभागृहामध्ये कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानकडून राज्यस्तरीय कला, शिक्षक ,पत्रकारिता, सामाजिक, पर्यावरण, या क्षेत्रातील ज्ञानवंत लोकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, कार्यक्रमात आयुष्यावर बोलू काही या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सचिन देवरे यांनी मार्गदर्शन केले तसेच संजय दादा गरुड यांनी शिक्षणाविषयी कशी वाटचाल करावी याबद्दल मुलांना शिक्षणाचे धडे दिले, शहराचे महापौर जयश्री महाजन यांनी शिक्षणाचा पाया पक्का करून स्पर्धा परीक्षेमध्ये कसे यश मिळवायचे ते त्यांनी मत व्यक्त केले,

त्यानंतर करियर महोत्सव स्पर्धेमध्ये विजेत्यांना बक्षीस वितरण देण्यात आले त्याप्रसंगी डाएट प्राचार्य डॉ अनिल झोपे, ग स सदस्य श्री विजय पवार प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील , एस डी भिरूड,प्रतीक्षा ताई पाटील,करीम सालार ,नगरसेविका निताताई सोनवणे , आनंद विद्याघर,प्रवीण जाधव,डॉ रुपेश पाटील
उपस्थित राहिले जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व सचिव हर्षाली पाटील यांनी सांगितले की या महोत्सवाचे नियोजन आम्ही दरवर्षी करणार आहोत या कार्यक्रमांमध्ये चेतन सोनवणे चेतन सोनार किशोर पाटील व हेमंत बडगुजर , एडवोकेट हेमंत दाभाडे, सुनील परदेसी,रामानंद वारके यांचे अमूल्य सहकार्य लाभले
सूत्रसंचालन श्रीमती ज्योती ताई राणे मॅडम यांनी केले