–
जळगाव : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्यानंतर दोघे मित्र रस्त्यावर पडताच भरधाव वाहनाखाली आल्याने ठार झाले. हा अपघात शनिवार, २४ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावर घडला. मयूर विठ्ठल लंकेसाळुंखे (१९, रा.पथराड, ता.धरणगाव) व दीपक समाधान पाटील (२१, रा.बोरखेडा, ता.धरणगाव) अशी मृतांची नावे आहेत.

जळगावातील मित्राला भेटून मयूर आणि दीपक हे शनिवार, २४ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घराकडे सुसाट निघाल्यानंतर गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावर अचानक दुभाजकावर दुचाकी आदळल्यानंतर दोघे रस्त्याच्या दुसर्या बाजूच्या रस्त्यावर फेकले जाऊन ते चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आले. यात मयूर याचा जागीच मृत्यू झाला तर दीपक याचा खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघात प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली.


