कुऱ्हा पानाचे येथे शिक्षकांच्या कार्याचा गौरव; शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवर शिक्षकांचा सन्मान

 भुसावळ (प्रतिनिधी ) - सुनसगाव येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे येथे दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी आई प्रतिष्ठान कडून आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण असून, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या ज्ञानदूतांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे, या भावनेतून आई प्रतिष्ठान, कुऱ्हे (पानाचे) यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. छबाई सभागृह, राजाराम धोंडो माध्यमिक विद्यालय, कुऱ्हा पानाचे येथे झालेल्या या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. आप्पासाहेब एकनाथ बडगुजर, चेअरमन, ग्राम विकास शिक्षण मंडळ, कुऱ्हा पानाचे हे होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुधाकरभाऊ बडगुजर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, भटके विमुक्त जाती विभाग, तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सौ. भावनाताई बडगुजर उपाध्यक्षा ग्रामविकास शिक्षण मंडळ, कुऱ्हा पानाचे उपस्थित होत्या. विशेष मान्यवर म्हणून श्री. समाधान आप्पा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच माजी मुख्याध्यापक गवळी सर ,डॉ. टी टी बारी  यांची श्री विलास रंदाळे ,अतुल पाटील , संतोष चौधरी सर ,श्रीकांत बरकले , आरती बडगुजर , सौ संगीता नागपुरे  यांची उपस्थिती लाभली.

या सोहळ्यात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

???? पुरस्कारार्थी शिक्षक

श्री. किरण आधार बडगुजर
राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुऱ्हा पानाचे

सौ. सुवर्णा बाळू महाजन
श्रीराम प्राथमिक विद्यालय, कुऱ्हा पानाचे

सौ. भारती राजेंद्र अत्रे मॅडम
जिल्हा परिषद शाळा, मांडवा दिगर

श्री. प्रमोद खलसे
प्राचार्य, इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय, शेंदुर्णी

श्री. दीपक बावस्कर
खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर

श्री. पी. डी. रोनखेडे
मुख्याध्यापक, तोंडापूर 

या सर्व शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अरविंद बावस्कर तथा श्री. प्रमोद उंबरकर यांनी प्रभावीपणे केले. आपल्या ओघवत्या निवेदनातून त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत कार्यक्रमाला उत्स्फूर्त वातावरण निर्माण केले.

शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा व्यक्ती नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शिल्पकार आहे. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान म्हणजे भावी पिढी घडविणाऱ्या संस्कारशक्तीचा सन्मान आहे, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

आई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक केले. शिक्षकांचा सन्मान ही केवळ एका दिवसाची परंपरा न राहता, त्यांच्या कार्याप्रती समाजाने व्यक्त केलेली कृतज्ञता असावी, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

**“ज्ञान देणाऱ्या ज्ञानदूतांचा सन्मान,

हीच समाजाच्या उज्ज्वल भविष्याची खरी ओळख!”**