भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये ख्रिसमस निमित्त साकारला सजीव देखावा

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये ख्रिसमस निमित्त विद्यार्थीनी सजीव देखावा सादर केला.
यावेळी बेबी जिजस यांच्या जिवनावर रेवरेन फॉदर आजो यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. प्रसंगी फिलेमिणा डिसौजा, प्रिंसीपल निना कटलर उपस्थित होते.
ताप्ती पब्लिक स्कुलच्या लहान मुलांनी ख्रिसमस निमीत्त साकारलेला सजीव देखावा पाहण्यासाठी आजू बाजूच्या नागरीकांनी एकच गर्दी केली होती.अतिशय सुरेख असा सजीव देखावा विदयार्थांनी सादर केला होता.
यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर सह शिक्षक वर्ग उपस्थित होते.
यावेळी सजीव देखावा सादर केलेल्या विद्यार्थ्यांना प्रिन्सिपल निना कटलर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.