भुसावळ – फोरेवर स्टार इंडिया च्या वतीने भुसावळच्या डॉ.संगीता मनोज बियाणी यांना रियल सुपर वुमन २०२२ सीझन ३ चा पुरस्कार देऊन राजस्थान येथील जयपुर मध्ये सन्मानित करण्यात आले.
या वेळी मिलीटरी चे मेजर जनरल निरज बाली, ब्रिगेडीयर भरतसिंग रावत, कर्नल अजय ध्याणी,लेफ्टनंट कर्नल मयंक बेबी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत भारतातील ७४ विशेष कामगीरी करणाऱ्या महिलांना रियल सुपर वूमन अवार्ड २०२२ सीझन 3 चा पुरस्कार देऊन सन्माणित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जयपूर येथिल राजेश अग्रवाल यांनी केले होते.
यावेळी भारतातील महाराष्ट्र,गुजरात,आध्रप्रदेश, मध्यप्रदेश,हरीयाणा, राजस्थान,केरळ,उत्तर प्रदेशातील महिलांना देखील सन्मानित करण्यात आले. त्यातील जळगाव जिल्ह्यामधून भुसावळातील बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सेक्रेटरी डॉ संगीता बियाणी यांचा समावेश होता.
संगीता बियाणी यांना या आधी पण ७५ विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे पती उद्योजक मनोज बियाणी, विनोद बियाणी,स्मिता बियाणी,रौनक बियाणी, मुस्कान बियाणी,पियुष बियाणी,खुशी बियाणी तसेच त्यांच्या शाळेतील शिक्षक वर्ग व नातेवाईकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
डॉ संगीता मनोज बियाणी ह्या गेल्या कित्येक वर्षापासून बियाणी एज्युकेशन या संस्थेची ध्रुवा सांभाळत आहे. त्यांच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी घडलेले आहेत, तसेच गरीब विद्यार्थ्यांना यांनी स्वखर्चाने शिक्षणासह पालन पोषण केले आहे.
डॉ संगीता मनोज बियाणी यांचे शिक्षण क्षेत्रातील उंच भरारी पाहता त्यांना या संस्थेने सन्मानित केले.



