मद्यपी पतीची पत्नी कडुन हत्या करंजी –


वरणगांव । प्रतिनिधी
सतत दारू पिऊन पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवुन तिला मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच डोक्यावर विळ्याने वार करून हत्या केली . हि घटना रविवारी रात्री घडली . याप्रकरणी वरणगांव पोलीसांत गुन्हा नोंद झाला असुन हत्या करणाऱ्या पत्नीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .
याबाबत माहिती अशी की करंजी – पाचदेवळी (ता. बोदवड ) येथील दगडु पुंडलीक सुरवाडे हे आपल्या पत्नी आशाबाई व दोन मुली व एका मुलासह मोलमजुरी करून रहीवास करतात . मात्र, दगडु सुरवाडे यांना दारुचे व्यसन असल्याने ते वारंवार आपल्या पत्नीवर चारीत्र्याचा संशय घेवुन तिला मारहाण करीत होते . अशाच प्रकारे रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दगडु सुरवाडे दारुच्या नशेत येवुन त्यांनी पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली . यामुळे संतापलेल्या आशाबाईने पती दगडु सुरवाडे यांच्या डोक्यावर विळ्याने सपासप वार करून ठार केले . यावेळी झालेल्या आरडा – ओरडीने घराबाहेरील अंगणात बसलेल्या मुलीने घरात धाव घेतली असता तिचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तर आईच्या हातात विळा असल्याचे पाहुन तिने आरडा ओरड करून शेजाऱ्यांना बोलावून घेतले . मात्र, तो पर्यंत दगडु सुरवाडे याचा मृत्यु झाला होता . या प्रकरणी रेशमा दगडु सुरवाडे (वय -१७) हिने वरणगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने मुलीच्या फिर्यादीवरून आई आशाबाई हिला पोलीसांनी ताब्यात घेतले . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैधरित्या होत असलेल्या मद्य विक्री मुळे एका सर्व सामान्य परिवाराच्या संसाराची राख रांगोळी झाल्याने संतापही व्यक्त केला जात आहे .