भुसावळ – शिवरत्न प्रतिष्ठान महिला मंडळ संचालिका सोनल रमाकांत महाजन (मा. नगरसेविका प्र. २४) यांच्या कडून आपल्या कुटुंबासाठी हातमजुरि,धुनी भांडी करून आपल्या संसाराला हातभार लावणाऱ्या १३५ महिलांना दिवाळी निमित्त साडी व फराळ वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शिव कॉलनी संत शिरोमणी सेना महाराज् (नाभिक संघ) इथे संपन्न झाला.
महिलांना त्यांचे आधार कार्ड,मतदान कार्ड,रेशन कार्ड यांची सुविधा बाबतीत समस्याची नोद घेण्यात आली. त्यासुद्धा समाजातील इतर महिलांसारख्याच दिशा नोकरी करून घराच्या संसाराला हातभार लावतात तसेच त्याही काम करून आपल्या घराला हातभार लावता येईल म्हणून त्यांनी स्वतःला कमी लेखू नये असे सोनल महाजन यांनी सांगितलं. प्रमुख उपस्तिथी प्रतिष्ठा महिला मंडळ च्या अध्यक्षा रजनी सावकारे,भाजप शहराध्यक्ष अनिता आंबेकर,नाभिक संघा च्या अध्यक्ष्या चित्रा सोनवणे,प्रणाली सूर्यवंशी,शोभा निकम,सीमा आमोदे सह शिवरत्न प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री बादशहा,वैशाली वंजारी,उषा मोरे,प्रियंका चौधरी,चैतली राणे सर्व सदस्य उपस्थीत होते.



