भुसावळ – येथील छायाचित्रकार राजेंद्र जावळे यांनी तापी नदीच्या किनाऱ्यावर सूर्योदयाचे सुंदर असे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यातून टिपले होते, या छायाचित्राला औरंगाबाद येथील राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून राजेंद्र जावळे या छायाचित्रकाराला स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले आहे.
त्याबद्दल भुसावळतील सीनियर फोटोग्राफर यांनी जावळे यांना नुकतेच पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित केले यावेळी अविनाश साळी, गोकुळ महाजन, श्याम गोविंदा, गणेश राठोड, भरत शिंपी आदी छायाचित्रकार उपस्थित होते.



