साकेगाव फार्मसी कॉलेजच्या डी. फार्मसी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ;


भुसावळ – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या ऊन्हाळी – २०२२ परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर
झाला. या परिक्षेत कै यशोदाबाई दगडु सराफ चॉरिटेबल ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, साकेगाव येथील औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर
परिक्षेत प्रथम वर्षात महाजन जागृती ८१.७०% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तसेच व्दितीय क्रमांक सिंग
प्रसिध्दी ८१.५०% व तृतीय क्रमांक गुमनानी निलेश ७७% यांनी मिळविला.
व्दितीय वर्षात पाचपांडे शितल ८१.३०% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तसेच व्दितीय क्रमांक वानखेडे
स्वाती ८१.१०% व तृतीय क्रमांक कोष्टी रेशमा ७९.८०% यांनी मिळविला.
संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सराफ व सह सचिव . संजय इंगळे व प्राचार्य डॉ. पराग पाटील व
विभाग प्रमुख प्रा. सुयोग चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
यांनी विदयार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेतले. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.