भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त रक्षाबंधन सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छान अशा राख्या आणल्या होत्या सकाळी शाळा भरल्यानंतर वर्गामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला विद्यार्थ्यांनी विद्यार्थीनींना भेटवस्तू दिल्या व चॉकलेट दिले यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर सोबत सोनाली मुजुमदार स्मिता जाधव व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



