रोटरी भुसावळ रॉयल्सचा एक घर एक झाड प्रकल्प संपन्न :

भुसावळ – येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स तर्फे शहरातील नवीन वस्ती शिरपूर कन्हाळारोड वरील अमृत कॉलनी येथे प्रत्येक घराजवळ एक झाड याप्रमाणे 50 झाडं लावण्यात आली व त्या झाडाच्या संवर्धनाची जबाबदारी त्या घरावर देण्यात आली वृक्ष संवर्धनाची ही जबाबदारी तेथील नागरिकांनी मोठ्या आनंदाने स्वीकारली या वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्याच घरातील प्रमुख व्यक्तीला मान देण्यात आला ज्या वृक्षांना आयुर्वेदिक महत्त्व आहे व जे वृक्ष भरपूर सावली देतात अशीच वृक्ष त्या ठिकाणी लावण्यात आली. या झाडांना कोणत्याही फिरत्या जनावरांचा अथवा पशुंचा काही एक त्रास नाही त्यामुळे ही झाडे निश्चितच नैसर्गिक फायदे मिळवून देतील असे क्लब तर्फे सांगण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी रॉयल्स चे अध्यक्ष प्रसन्न पांडे, सचिव सागर विसपुते तसेच राजेंद्र यावलकर, गणेश फेगडे, लोकेश कन्सल, अनंत वाटपाडे, विनोद तायडे, धीरज मुळे, मोहन पाटील, महेश फालक, पवन पाटील व तसेच
अमृत कॉलोनीतील मुकेश अंभोरे, निलेश डोळे, वृषाली पवार, संतन लेमोस, जयसिंग इंगळे, भिरुड काका, सुधीर भारंबे, अशोक सुरवाडे, राजाराम पाटील
हे उपस्थित होते.