भुसावळ – दिनांक २५ जून २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली असून राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक १० जून २०२२ च्या रानिआ/नप/२०२२/प्र.क्र ५/का -६ पत्रकानुसार सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेत म्हटले आहे कि प्रारूप व अंतिम प्रभागनिहाय मतदार यादीस जिल्हाधिकारी व नगरपरिषद / नगरपंचायत यांचे संकेतस्थाळावर प्रसिद्धी द्यावी परंतु भुसावळ नगरपरिषदेच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. यामुळे सामान्य नागरिकाला नगरपरिषद कार्यालय किंवा इतर प्रशासकीय कार्यालयात जाऊन आपले नाव कोणत्या प्रभागात सामील झाले आहे हे तपासावे लागणार आहे. रामटेक नगरपरिषदेने दिनांक २१ जून २०२२ रोजी मूळ प्रारूप प्रभानिहाय यादी फोटोसहित प्रसिद्द केलेली आहे. याची लिंक https://drive.google.com/drive/folders/1z1GzwrL4FGwy6522zW2AP2sYKQelAEHd हि आहे.
शासनाच्या नियमानुसार फोटोसहीत यादी प्रसिद्ध होणे बंधनकारक असल्याने ती त्वरित प्रसिद्ध करण्याच्या सूचना स्थानिक भुसावळ नगरपरिषदेच्या प्रशासनास द्याव्यात व नागरिकांची हेळसांड थांबवावी असे निवेदन शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त उर्विंदर पाल सिंग मदान यांना दिले आहे.



