भुसावळच्या शिवसैनिकांना संपर्कप्रमुख मार्गदर्शन करणार : उद्या संध्याकाळी ५ वा. ब्राम्हण संघात बैठक :

भुसावळ- भुसावळ विधानसभेतील शहर व तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना रावेर लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश राणे आणि जिल्हाप्रमुख समाधान महाजन हे उद्या, रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी संध्याकाळी ५ वा. मार्गदर्शन करणार आहे.

भुसावळ येथील बाजार वार्डातील ब्राह्मण संघात ही बैठक होणार असून भुसावळ शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, रेल कामगार सेना, अल्पसंख्याक आघाडी, शिक्षक सेना, दिव्यांग सेना, एस टी कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे असे आदेश तालुका व शहर शिवसेनेच्या मार्फत देण्यात आले आहे.