भुसावळ – बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या भव्य प्रांगणात विद्यार्थ्याना योगा करण्यासाठी उत्तम व्यवस्था केली गेली होती.याप्रसंगी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी,संचालिका स्मिता बियाणी, रोनक बियाणी यांनी ही विद्यार्थ्यांसोबत योग प्रात्यक्षिक करून योगाभ्यासाचा आनंद घेतला.
सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी ही योगाची प्रात्यक्षिके आत्मसात केली. सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी यांनी शुभेच्छा दिल्या.या जागतिक योग दिवस प्रसंगी शाळेचे प्राचार्य डी एम पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्त्व विशद केले.याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



