भुसावळ न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा :


भुसावळ – येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन भुसावळ वकील संघ व विधी सेवा समिती भुसावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्साहात योग करून साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश व्हि. सी. बर्डे हे होते अति. जिल्हा न्यायाधीश यु एम पदवाड, जिल्हा न्यायाधीश आर एम जाधव, दि‌.न्यायाधीश क.स्तर डी बी डोमाळे , दि.न्यायाधीश क.स्तर के एस खंडारे यांची शिबिरासाठी उपस्थिती होती.
योग गुरु म्हणून सौ कीर्ती सुनील दाभाडे यांनी विविध आसन व योगाचे प्रशिक्षण दिले उपस्थितांनी त्यांचे अनुकरण केले तसेच कोणते आसन का करावे याविषयी मार्गदर्शन योगगुरु कीर्ती दाभाडे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा न्यायाधीश व्ही सी बर्डे यांनी योगा सोबतच शरीराच्या आरोग्यासाठी आहारही महत्त्वाचा आहे प्रत्येकाने आहाराच्या वेळा सांभाळत सकस आहार व सोबत योग केला की मनुष्य निरोगी व दीर्घायुष्य राहिल असे म्हटले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एडवोकेट जास्वंदी भंडारी महिला प्रतिनिधी यांनी यावर्षीची संकल्पना “मानवतेसाठी योग ” ही आहे योग्य माणसे जोडून सद्भाव व प्रेम विकसित करतो. मानवतेच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी योगाचे अनन्य साधारण महत्व अधोरेखित करण्यासाठी 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले.
भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट तुषार पाटील यांनी योग ही साधना आहे यावर्षी एकत्रित योग दिन साजरा करण्याची संधी आम्हाला मिळाली ही खूप आनंदाची बाब आहे भुसावळ वकिल संघ नेहमीच सामाजिक उपक्रमात हिरिरीने भाग घेत असतो यापुढेही असेच विविध उपक्रम वकील संघाकडून राबविण्याले जातील असे आपल्या मनोगतात म्हटले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट जास्वंदी भंडारी यांनी तर आभार प्रदर्शन किशोर पिंगाने यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहसचिव एड.पुरुषोत्तम पाटील ,श्री हिरामन कोळी श्री जगदीश मानकर, कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतली या योग शिबिराला वकील संघ सदस्य अँड. पी.आर मोझे, एड.नरेंद्रमहाजन,एड.निलेश भंडारी,एड.कैलाश शेळके,एड.उमेश पाटील,सरकारी वकील मोहन देशपांडे, कर्मचारी यांची उपस्थिती होती.