ना.गुलाबराव पाटील यांनी सार्वजनिक उपक्रमात व विकास कामात कधीही परपोस केला नाही इतरांनी नाहक श्रेय लाटण्याचे प्रयत्न करू नये – शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन

बोदवड – भुसावळ – तालुक्यातील ७९ गावांना मुक्ताईनगर हतनूर च्या जलसाठ्यातून पाणीपुरवठा होत आलेला आहे.तरीही या तालुक्यात अनेक गावे तहानलेली आहे. या तहानलेल्या गावांची तहान भागवण्या साठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे अविरत प्रयत्नशील आहे.याचाच एक भाग म्हणून भुसावळ तालुक्यातील साकेगाव,कंडारी,भानखेडा,फेकरी किन्ही अशा गावाला करोडो रुपये पिण्याच्या पाण्यासाठी पालकमंत्र्यांनी मंजूर केलेले आहे., या यशाचे श्रेयलाटण्या अनेकांनी मात्र तालुक्यात केविलवाणी भाऊगर्दी चालवली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,महाराष्ट्र राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून स्वच्छता व पाणीपुरवठा खाते हे शिवसेने कडे आले.व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे आहे. ना.पाटील यांनी पिण्याच्या पाण्याचे आलेले हे पुण्याचे काम यशस्वी पणे लोकांची तहान भागविण्यासाठी हाती घेतले आहे. म्हणून भुसावळ तालुक्यातीलच नाही तर जळगाव जिल्ह्यातील अनेक पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या खेड्यापाड्यात पाणीपुरवठ्याच्या मजबूत अश्या योजना देण्याचे प्रयत्न प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे सुरू केले आहे.त्यात वरणगाव शहरासाठी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा असेल किंवा साकेगाव कंडारी,भानखेडा,फेकरी,कंडारी,शिन्दी अशा गावांच्या पिण्याचा प्रश्न असेल याकडे जातीने लक्ष घालून,पंधरा पंधरा वर्षाची सत्ता असलेल्याना जमले नाही ते अवघ्या दोन वर्षाच्या आपल्या कार्यकाळात पालकमंत्री ना.पाटील यांनी करून दाखवले आहे. वरणगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योजनेचे २५ कोटी रुपये खर्चा चे काम आज अंतिम टप्प्यात आले आहे. बोदवड शहराला तीस तीस दिवस पिण्यास पाणी मिळत नसतांना तिथला पाणीपुरवठा सात दिवस केला,त्याचप्रमाणे भुसावळ तालुक्यातील साकेगाव,कंडारी,
भानखेडा,फेकरी,शिन्दी अशा गावांना कायमस्वरूपी जलस्त्रोत आणि पाणीपुरवठा ऊद्भव निर्माण करण्यासाठी व महिला भगिनींचे तथा आबालवृद्धाचे मैलोगणती डोक्यावरून पाणी वाहून आणण्याचे कष्ट कायमचे दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने फक्त जळगाव जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात तून पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेऊन अनेक योजनांची कामे पूर्णत्वाकडे पोहोचवलेली आहेत.आता अशा आकारास आलेल्या विकास कामांची व जनहीताच्या उपक्रमांचे श्रेय लाटण्यासाठी आता या भुसावळ परिसरात काही वांझोट्या पुढार्‍यांची केविलवाणी भाऊ गर्दी सुरू झाली आहे, त्यांनी दत्तक पुत्राना डोक्यावर घेण्या पेक्षा आपल्या सत्ताकाळात औरस पुत्र का तयार केले नाही ! याचाही प्रश्न आता लोक विचारू लागले आहे. या सर्व परिस्थितीचा विरोधकांनी गांभीर्याने विचार करावा आपलं चिंतन करावे आणि आपली असेल असतील नसतील तेवढे प्रयत्न करून गावकुसात अपूर्ण असलेल्या सामूहिक हिताच्या आणि विकासाच्या योजना नावा रूपास आणण्याचे प्रयत्न करावे इतरांनी केलेल्या कार्याचे श्रेय लाटून घेण्याचे केविलवाणे प्रयत्न यापुढे थांबवावी एवढच शिवसेनेच्या वतीने मी समाधान महाजन सर्वांना जाहीर आवाहन करतो सेनेने आज पर्यंत केलेल्या कोणत्याही जनहिताच्या सामूहिक वैयक्तिक कामाचा ढिन्डोरा पिटलेला नाही,ना.गुलाबराव पाटील,आमचे नेते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे खरे पालक आहे. कोणत्याही विकास कामाच्या मंजुरीसाठी त्यांनी कधीही भेदभाव किंवा परपोस केल्याचे एकही उदाहरण नाही,तरी विरोधकांनी अनेक अंगीच्या नानाविध कर्कश आवाज व कल्लोळ काढवायला सुरुवात केल्याने हे आम्हांला नाईलाजाने बोलावे लागते आहे.
शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांच्या 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या मूलमंत्रावर आलेला आहे शिवसेना नेहमी समाज कार्यात अग्रेसर असून नानाविध समाज कार्य करण्यात आमच्या शिवसैनिकांचा हातखंडा आहे बाळासाहेबां पासून तर ते आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना पर्यंत आम्हाला त्यांची शिकवण आहे त्यामुळे आम्ही विनाकारण याचं श्रेय वादात न पडता आमच्यासह आमचे नेते शिवसैनिक व पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे सदैव काम करत राहू आमचे उपनेते तथा पाणीपुरवठामंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी सदरच्या पाणीपुरवठा योजना या जनसेवा या माध्यमातून मंजूर केलेले आहेत आणि त्याचे सर्व श्रेय नामदार गुलाबराव पाटील यांना व पर्यायाने शिवसेनेला जाते असे या प्रसंगी प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते असेही श्री महाजन यांनी म्हटले आहे .