भुसावळ :-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भटिंडा हुन हुसेनी बाला मार्गे फिरोजपुर ला जात होते. मात्र वाटेतच काही लोकांनी विरोधकांनी रस्ता रोको केला. त्यामुळे पंतप्रधानांचा तापात याठिकाणी पंधरा ते वीस मिनिटात थांबला. पंजाब दोऱ्याच्या सुरक्षितेच्या गंभीर उल्लंघनानंतर पंतप्रधान मोदींच्या तापाने परत भटिंडा विमानतळावर परतण्याचा निर्णय घेतला.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी भटिंडा विमानतळावर उतरले व तेथून ते हुसेनी वाला येथील राष्ट्रीय स्मारकावर जाणार होते. मात्र पाऊस आणि खराब दृश्य मानते मुळे पंतप्रधानांनी हवामान सुचवण्यासाठी वीस मिनीटे वाट बघितली. जेव्हा हवामान सुधारले नाही तेव्हा असे ठरले की, रस्त्याने राष्ट्रीय मेरिटर्स मेमोरियल ला भेट देईल. त्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागणार होता महासंचालक पंजाब पोलीस यांच्याकडून आवश्यक सुरक्षाव्यवस्थेची याबाबत पुष्टि मिळाल्यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यास निघाले.हुसेनी वाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर जेव्हा पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवला असल्याचे दिसून आले. पंतप्रधान 15 ते 20 मिनिटे या उड्डाणपुलावर अडकले होते त्यामुळे या सुरक्षेमध्ये अक्षम्य अशी चूक दिसून येत आहे. अनेक प्रश्नचिन्ह या सुरक्षिततेबाबत निर्माण होत आहेत. याला सर्वस्वी पंजाब सरकार तेथील पोलीस डिपारमेंट जबाबदार आहे. हे प्रकार संशयास्पद वाटतं आहे. आज आपल्या देशाचे पंतप्रधान एक सर्वोच्च पद आहे आणि त्यांची जीवाची सुरक्षा करणं , त्यांचं रक्षण करणं त्यांना आवश्यक असा सुरक्षा सेवा सुविधा पुरविणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. अशा सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीची च सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या, बेशिस्त बेजबाबदार पंजाब सरकार व तेथील संबंधित सुरक्षा यंत्रणेस जबाबदार, धरण्यात यावे.व अशा प्रकारच्या घटना वारंवार होऊ नये व देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असणाऱ्या सर्वच व्यक्तींच्या सुरक्षेस धोका निर्माण होऊ नये तसेच तेथील व तेथे परराज्यातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला च्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांचेवर योग्य ती कारवाई होऊन पंजाबला असुरक्षित व धोकेदायक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात याव व त्याठिकाणी त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी नम्र विनंती. त्याशिवाय येथील सुरक्षा यंत्रणा भक्कम होऊ शकणार नाही.ज्या राज्यात देशातील सर्वोच्च पद भूषविणारे पंतप्रधान असुरक्षित होतात, त्या ठिकाणच्या सुरक्षितेचे धिंडवडे उडतात तर त्या ठिकाणच्या सामान्य जनतेच्या सुरक्षिततेची काळजी तेथील सरकार घेत सेल का? म्हणजेच त्या ठिकाणची नागरिक सुद्धा असुरक्षित आहेत.हे या घटनेवरून सिद्ध होतं अशा आशयाचे मेलद्वारे पत्र भाजपा भुसावळ चे कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



