भुसावळ -शहराच्या गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे मात्र शहराचा विस्तार बघता त्यानुसार पोलिस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येत आहे याकरीता शहरातील बंदअवस्थेत असलेल्या पोलीस चौक्या सुरू करणेसाठी तसेच अतिरिक्त पोलीस कर्मचारी संख्या वाढवून देऊन चौक्या सुरू कराव्या अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे उमेश नेमाडे यांनी केली असून याबाबत गृहमंत्री ना. दिलीप वळसे .पाटील यांना दिले .
निवेदनात नमूद आहे की ,भुसावळ शहर हे रेल्वे जंक्शन असून,सर्वजाती धर्माचे लोक त्याठिकाणी वास्तव्यास आहेत,पूर्वीची लोकसंख्या असतांना देखील शहरात विविध भागात मुख्य पोलीस चौकी अस्तित्वात होत्या,
भुसावळ शहराचा विस्तार झपाट्याने होत असून ,गुन्हेगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे,मध्यप्रदेशच्या सिमेपासून भुसावळ हे शहर पहिलेच मोठे शहर लागते,माध्यप्रदेशातून शस्त्रास्त्रे, गावठी बंदुका यांची मोठ्या प्रमाणावर आयात होते,त्यामळे लूटमार,घरफोड्या हे नित्याचेच झालेले आहे,गावठी कट्टे वापरणे ही फॅशन दिसून येते,त्यामुळे भीती निर्माण होऊन शहराची प्रतिमा खराब होत जिल्ह्यात सतत बदनाम शहर म्हणून ओळख झाली आहे,
शहरात विविध भागांत भयभीत वातावरण निर्माण झाले असून त्या प्रमाणात पोलीस कर्मचारी संख्या नसल्याने सदर भागातील पोलीस चौकी बंदवस्थेत आहे . शहरात सध्या बंद असलेल्या पोलीस चौकी मध्ये गोपाळ नगर पोलीस चौकी , पोलीस चौकी न,3 , जामनेर रोड नाहटा कॉलेज पोलीस चौकी , 15 बंगला पोलीस चौकी , 7 नंबर पोलीस चौकी चांदमारी चाळ यांचा समावेश आहे .
या बंदअवस्थेत असलेल्या पोलीस चौक्या सुरू करणेसाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी संख्या वाढवून देऊन चौक्या सुरू करण्याचे आदेश दिल्यास शहरातील नागरिकाना भयमुक्त असल्याचा दिलासा मिळेल, सदरील विषय गांभिर्य पूर्वक घेऊन या शहरातील नागरिक ,महिला,व युवकांच्या व भविष्याच्या दृष्टीने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.



