वरणगाव – येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा भाजपचे सय्यद जाफरअली मकसूदअली उर्फ हिप्पीशेठ यांच्यासह वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष संतोषभाऊ माळी (आपला माणुस) यांनी आणि कार्यकर्त्यांनी आज मंगळवार मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. खासदार तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजयजी राऊत यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले.

याप्रसंगी उपनेते रविंद्रजी मिर्लेकर, रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलासजी पारकर, जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, भुसावळ शहरप्रमुख निलेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
आता वरणगावात शिवसेनेची वाढणार !
भाजपचे सय्यद जाफरअली उर्फ हिप्पीशेठ यांचा मुस्लिम समाजात दबदबा आहे. मकाशेठ यांचे चिरंजीव हिप्पीशेठ असल्याने त्यांनी हिंदू-मुस्लिम समाजात जातीय सलोखा कायम राखण्याचे काम ते नेहमी करत असतात. त्यांच्यामागे देखील मुस्लिम समाजातील तरुण आहे. आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा शब्द प्रमाण मानतात. तसेच दुसरे शिवसेनेत प्रवेश करणारे संतोष माळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरणगाव शहराचे माजी शहराध्यक्ष राहिलेले आहे. ते शहराध्यक्ष असताना वरणगावात राष्ट्रवादी वाढवण्याचे काम त्यांनी केले होते. परंतु मध्यंतरी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने वरणगाव शहरातील जुने राष्ट्रवादीतील पदाधिकारी दुखावल्या गेल्याने हे नाराज होते. ते नेहमी शिवबा मंडळ आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले विकास संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रम राबवित असतात आणि जनसामान्य माणसांना कामात मदत करतात. माळी समाजातील तरुण देखील त्यांच्या पाठीशी आहेत.
नगरपालिकाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी हिप्पीशेठ आणि संतोष माळी यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच वरणगावात शिवसेनेची ताकद वाढेल हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.
यांनी केला शिवसेनेत प्रवेश
मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हिप्पीशेठ, वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संतोष बळीराम माळी, मारूळ तालुका यावल येथील ग्रामपंचायत सदस्य सय्यद नदीम अक्तर युनुसली, सय्यद शकील सय्यववली, इंजि. सय्यद मुजाहिद, अबू सुफियान, मुदस्सर खान, अरबाज पैलवान, अजिमखन असारखान, जहीर पठाण यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले.


