आशावादाला बळकटी : भुसावळ येथील गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाची कौतुकास्पद भरारी ; महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नौकरीची दारे दिली खुली करून ;

भूसावळ ; कोरोनाकाळातून जात असतांनाही भुसावळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना रोजगार मिळावा ह्या साठी अथक परिश्रम घेतले गेले .
कोरोनाकाळानंतर आर्थिक शैक्षणिक आणि औद्योगिक चक्र हळूहळू गती पकडत आहे असे आशावादी चित्र आता निर्माण होते आहे. आणि ह्याच आशावादाला आणखीन बळकटी देण्याचे काम भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील शैक्षणिक वर्षा दरम्यान आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्र संक्रमण काळातून जात असतांनाही भुसावळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना रोजगार मिळावा ह्या साठी अथक परिश्रम घेतले गेले. आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींच्या क्षमतेवर औद्योगिक क्षेत्राने सार्थ विश्वास दाखवत राष्ट्रीयच नाही तर आंतररार्ष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांनी भुसावळ येथील गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना नोकऱ्यांची दारे खुली करून दिली.
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस , कॅपजेमिनी, व्हीक्रेयटेक, एमटेक, एटीओएस सिंटेल, बिर्ला सॉफ्ट, आयुष प्रोकोन, व्हेलोसिटी ऑर्गनाइज़ेशन अश्या नामांकित संगणक, आयटी , अवजड उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, स्थापत्य आणि ऊर्जा क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्यांनी गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना नोकरी उपलब्ध करवून दिली आहे.
यामध्ये महाविद्यालयाच्या समीक्षा पाटील (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस), भूमिका भांबरी (व्हीक्रेयटेक), रक्षा अत्तरदे (एमटेक), प्रियंका बडगुजर (कॅपजेमिनी), प्रेरणा असवार (बिर्ला सॉफ्ट), प्रतीक्षा नारखेडे (एटीओएस सिंटेल), ऋषिकेश सावकारे आणि पठाण रईसखान (आयुष प्रोकोन) आणि गोकुळ नायर (व्हेलोसिटी ऑर्गनाइज़ेशन) ह्या ठिकाणी रुजू होऊन आपल्या भुसावळपरिसराचा गौरव वाढवत आहेत. ह्याच दरम्यान महाविद्यालयाने शंभराहून अधिक कंपन्यांशी सामंजस्य करार केल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर राममोहन अग्रवाल यांनी दिली.
“आमच्या महाविद्यालाच्या दूरगामी शैक्षणिक धोरणांतर्गत केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर आधुनिक उद्योगांच्या अपेक्षा आणि तंत्रज्ञान बदल याकडे बारीक लक्ष पुरवत अष्टपैलू अभियंता घडवण्याकडे आमचा कल असतो आणि ह्याच विचारांचा परिपाक म्हणजे आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मनुष्य बळावर औद्योगिक क्षेत्राने दाखवलेला सार्थ विश्वास” असे प्रतिपादन ह्या प्रसंगी प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी केले.
सदर उपक्रमासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर राममोहन अग्रवाल, ईजाक पॉल, डॉ.श्रीकांत चौधरी, गजानन पाटील, जयेश महाजन, गिरीश सोनावणे, डॉ.नीता नेमाडे, मनीष माटा, गौरव टेंभुर्णीकर, डॉ. वाय.जी. परदेशी, सचिन हरीमकर, अभिजीत इंगळे यांनी मेहनत घेतली.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, पंकज संड विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले.