जळगाव – नाशिक विभागाचे शिक्षक आमदार श्री किशोर दराडे यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षकांचे प्रश्न जागच्याजागी सोडविण्यासाठी शिक्षक दरबाराचे आयोजन जळगाव येथे केले होते. या शिक्षक दरबारात उपप्राचार्य, जुक्टो संघटनेचे सल्लागार व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे यांनी विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडून अधिकाऱ्यांना कोंडीत पकडत जागेवरच निर्णय घेण्यास भाग पाडले. आणि अवघ्या सभागृहाचे मन जिंकून घेतले. निमित्त होते नाशिक विभागाचे शिक्षक आमदार यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयोजित केलेला जळगाव येथील जनता दरबार.
सविस्तर वृत्त असे की, माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या शिक्षक दरबारात जळगाव जिल्ह्यातील मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षण विभागातील अधिकारी, नाशिक येथील उपसंचालक श्री नितीन उपासणी तर उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख संजय चव्हाण, संभाजीराव पाटील, श्री एस डी श्री एच जी इंगळे, श्री गजानन निळे, श्री नरेंद्र सपकाळे, श्री नाना पाटील, रोड,यांच्यापासून जळगाव येथील शिक्षण विभागातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण प्राथमिक विभागातील शिक्षणाधिकारी विकास पाटील पे युनिट मधील श्री शर्मा साहेब श्रीमती दिपाली पाटील, उपशिक्षणाधिकारी देवांग श्री घुगे यांच्यापासून सर्व संबंधित अधिकारी आवर्जून उपस्थित होते.
या शिक्षक दरबारात उपप्राचार्य तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा उत्तम सुरवाडे शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मोठ्या तळमळीने मांडले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून व्हावे यासंदर्भात विविध संघटनांकडून सर्वस्तरावर कसा पाठपुरावा केला, तरीही अधिकारी वर्ग कशी दाद देत नाही हे अत्यंत प्रभावीपणे मांडत त्यांनी सांगितले की, या प्रश्नाच्या संदर्भात माध्यमिकचे तत्कालीन शिक्षण अधिकारी बी जे.पाटील, युनिटचे श्री शर्मा साहेब, उपसंचालक श्री नितीन उपासणी, पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील, शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे. मी जिल्हा बँकेचे पदाधिकारी अधिकारी या सर्वां पर्यंत पाठपुरावा करूनही अजूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. नाशिक विभागात इतर सर्व जिल्ह्यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये होतात. फक्त जळगाव जिल्ह्यात होत नाही, उपासनी साहेब आपण आपल्या स्तरावर आदेश देऊनही त्याला केराची टोपली दाखवली जाते, ची अंमलबजावणी झालेली नाही. हे सर्वांच्या समक्ष त्यांनी श्री उपासनी साहेबांच्या लक्षात ही बाब आणून दिली. आणि आता जागेवरच घ्या अशी मागणी केली. त्यावर शिक्षण उपसंचालक यांनी युनिटचे शर्मा यांना या प्रश्नासंदर्भात ताबडतोब कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप संबंधीचा राज्यभर व्याप्ती असलेला अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मांडताना प्रा उत्तम सुरवाडे म्हणाले,”आदरणीय दराडे साहेब आपल्या नावाचा एक आदरयुक्त दरारा आहे. सेना भवन आणि मातोश्री पर्यंत आपल्या नावाचा दबदबाआहे. विधिमंडळात वेगवेगळे कायदे करतात म्हणून राज्यस्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप चा प्रश्न खूप गंभीर बनला आहे. मागच्या वर्षी धोरणाचा काळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप चे फॉर्म सर्व यंत्रणा बंद असल्यामुळे ऑनलाईन भरता आलेले नाहीत. विद्यार्थ्यांसाठी आता फॉर्म भरण्याची मुदत समाजकल्याण विभागाने वाढवून दिलेली आहे . परंतु काही अधिकारी त्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी करीत आहेत. कारण नसताना कागदपत्र कान साठी फिरवाफिरव करत आहेत. साहेब आपण या प्रश्नात जातीने लक्ष घालून सामाजिक न्याय विभागाची चर्चा करून मागील वर्षाचे उत्पन्नाचे दाखले न मागता चालू वर्षाचे उत्पन्नाचे दाखले विचारात घेऊन एकही विद्यार्थी स्कॉलरशिप पासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट परिपत्रक शासन स्तरावर काढावे.
कोरोना चा काळ हा नैसर्गिक आपत्तीचा काळ होता असं मानून संपूर्ण राज्यातील स्कॉलरशिप पासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून राज्य शासनास धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडावे. पूर्वी हे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले होते परंतु त्याचे बिल शासनाने वेळेवर अदा केले नाही, त्यामुळे बऱ्याच अडचणींना विद्यार्थी आणि पालक आणि महाविद्यालय यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची खूप वाताहत झाली. आताही ती अनागोंदी अजूनही संपलेली नाही. म्हणून स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना निर्णय सोयीचा आणि सोपा व्हावा म्हणून आपण शासनस्तरावर प्रयत्न करून एम के सी एल सारख्या यंत्रणेशी टाईप करून हा स्कॉलरशिपचा प्रश्न मार्गी लावावा अशी आग्रही मागणी केली. राज्यातील अनेक शाळा-महाविद्यालयांना हे स्कॉलरशिप चे पैसे अद्याप मिळालेले नाही. यासंबंधी आपण जातीने लक्ष घालावे अशी विनंती केली.
त्याच बरोबर नगर.पालिकेत स्वीकृत नगरसेवक घेताना वकील, सी.ए, सी इ.ओ. नगर रचनाकार, इत्यादी प्रवर्गातील व्यक्तींना पाच वर्ष अनुभव असावा अशी अट आहे, परंतु फक्त शिक्षकांच्या बाबतीत मात्र वेगळी आहे. शिक्षकांच्या बाबतीत असा दुजाभाव का? नगर विकास खात्याच हे संभ्रम निर्माण करणारे परिपत्रक दुरुस्त करून शिक्षक वर्गाला न्याय द्यावा. शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग नगरपालिकेच्या सभागृहातही करून घेता यावा. साठी आपण पाठपुरावा करावा अशी मागणी केली. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात शिक्षकांनीही उस्फूर्तपणे या मागणीला पाठिंबा दिला. शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडल्या मुळे तसेच नुकतेच उपप्राचार्य पदी नियुक्ती झाल्यामुळे प्रा.उत्तम सुरवाडे यांचा या दरबारात खास सत्कार करण्यात आला. शिक्षण विकास मंडळ विवरे बुद्रुक तालुका रावेर या संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड होऊन संस्थेच्या सचिव पदी चौथ्यांदा निवड झाल्याबद्दल jucvto संघटनेचे उपाध्यक्ष श्री शैलेश राणे यांचाही सत्कार करण्यात आला.
या शिक्षक दरबारात ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक सुनील गुरव यांनी अनुकंपा तत्त्वावर ज्या शिक्षकांच्या वारसदारांना नोकऱ्या दिलेल्या आहेत त्यांना मयत कर्मचाऱ्याचा शालार्थ आयडी जसाचा तसा दिल्यास अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांच्या वारसदारांना न्याय मिळेल त्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली. सध्या एसटीचा संप असल्याने प्रवासाच्या सुविधा जळगाव जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना नसल्याने नाशिक येथे प्रलंबित कामासाठी पुन्हा पुन्हा न बोलता त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून शिक्षण उपसंचालक कार्यालय सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
जुक्टो संघटनेचे अध्यक्ष श्री सुनील सोनार सचिव श्री वळ लिकर सर श्री अतुल इंगळे. व ज्युक्टो संघटनेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी संघटनेची भूमिका शिक्षक दरबारात प्रभावीपणे मांडल्याबद्दल तिघही सदस्यांचे अभिनंदन केले आहे.



