वैज्ञानिक होण्यासाठी मोठ्या शिक्षणाची गरज नाही – जयंत जोशी

भुसावळ- देशासाठी नवनवीन तंत्रज्ञान तयार करण्याचे काम विविध विज्ञान संस्थांमधून होत असते यामध्ये इस्रो संस्थेने देखील मोठे काम केलेले आहे या संस्थांमध्ये जाण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही परंतु तुमच्यामध्ये जे कौशल्य आहे ते कौशल्य विकसित करून समाजासाठी आपण काय करू शकतो याकडे लक्ष देण्याची गरज आहे समाजाभिमुख व गरजेचे संशोधन झाल्यास त्या संशोधनाचा स्वीकार हा होत असतो याकरिता आपल्या अंगी असलेले कौशल्य विकसित करून नवनिर्मिती करण्यावर भर द्यावा वैज्ञानिक होण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नसल्याचे प्रतिपादन इस्रोचे माजी वैज्ञानिक जयंत जोशी यांनी केले

महाराष्ट्रामध्ये रामानुजन अमृत भारत गणित यात्रेचे आगमन झाले असून सकाळी दीपनगर येथील शारदा माध्यमिक विद्यालय व कीन्ही येथील सर्वोदय हायस्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साडेचार किन्ही येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश येवले होते यावेळी  मॅथ गुरू ऑफ इंडिया बी एन राव, मा वैज्ञानिक इस्रो डॉ.जयंत जोशी, होमी भाभा सायन्स सेंटर चे डॉ.सुधाकर आगरकर, रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रमौली जोशी ,ब्रजेश दीक्षित, मेहुल हरसोला ,किशोर राजे,महाराष्ट्र समन्वयक सुनील वानखेडे ,संदीप पाटील ,संजय चौधरी, भगवान पाटील, अरुण पाटील, ज्ञानदेव पाटील, अशोक येवले,मुख्याध्यापक डी.पी.साळुंखे,पर्यवेक्षक डी.सी.बाविस्कर,

दीपनगर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष  आर एन गाजरे एस जी चौधरी व्ही पी राणे मिलिंद गाजरे पी एस कवठे  मॅथ गुरू बी एन राव यांनीविद्यार्थ्यांनी गणिताविषयी चा बाऊ करून घेतला आहे मात्र गणित सोपे आहे हाताच्या बोटाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना समजावून समजावून सांगितले गणितातील पाढे बोटावर करून दाखवले तसेच वर्ग घन व मोठी अंक बेरीज कागद पेनाच्या शिवाय करता येते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व गणित सोपे असल्याचे सांगितले

यावेळी जे.पी.सपकाळे सुरेश अहिरे, संजू भटकर, अनिल माळी, शैलेंद्र भंगाळे जीवन महाजन प्रदीप सोनवणे,योगेश इंगळे,समाधान जाधव ,भूषण झोपे, राजेंद्र परसे, नीलिमा पाटील,भाग्यश्री भंगाळे आदी उपस्थित होते.